स्पृहा जोशी ही मराठी कलाविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे.
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेत्रीने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते.
सध्या स्पृहा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा खास लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये स्पृहा अतिशय सुंदर दिसते आहे.