ही सोज्वळ सुशीला कशी वाटली? 

सोनाली 'सुशीला-सुजीत' सिनेमातून भेटीला येत आहे. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडदेखील गाजवलं आहे. सोनाली 'सुशीला-सुजीत' सिनेमातून भेटीला येत आहे. 

या सिनेमात ती सुशीला हे पात्र साकारताना दिसणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. 

सोनालीने अशाच एका प्रमोशनसाठी खास लूक केला होता. लाल रंगाचा ड्रेस तिने परिधान केला होता. 

याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये सोनालीचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे. 

सोनालीने हे फोटो शेअर करत त्याला "पियु बोले" असं कॅप्शन दिलं आहे. 

सोनालीचा 'सुशीला-सुजीत' सिनेमा २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. 

Click Here