सनसेट, बीच अन् बिकिनी...सोनालीचा लूक पाहून चाहते घायाळ
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे
आजच्या दिवशी तिने बीचवरील हे सुंदर फोटो शेअर केलेत
या बिकिनी लूकमध्ये ती कमालीची फिट आणि सुंदर दिसत आहे
निळाशार समुद्र, हळूहळू बुडणारा सूर्य आणि सोनालीचं फोटोशूट सगळंच जमून आलं आहे
वाऱ्यावर उडणारे मोकळे केस, वेगवेगळ्या पोज देत ती एन्जॉय करत आहे
'मी दिवसेंदिवस आणखी तरुण होतेय का?' असं कॅप्शन देत तिने स्वत:लाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे
अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिच्या रुपाचं कौतुक केलं आहे