मराठमोळी शर्वरी आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री
मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली.
शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची नात आहे. पण तरीही तिचा मार्ग सोपा नव्हता.
शर्वरीने अभिनय, सौंदर्य आणि फिटनेस याची सांगड घालत आजवर टप्प्याटप्प्याने यश मिळवले आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप अडचणींचा सामना केल्याचे शर्वरीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
आता मात्र मराठमोळ्या शर्वरीची गणना आघाडीच्या युवा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये आवर्जून केली जाते.
शर्वरी आपल्या सौंदर्याला बोल्डनेसचा तडका द्यायला मागे पुढे पाहत नाही.
नुकतंच शर्वरीने सोशल मीडियावर बोल्ड अन् बिनधास्त फोटोशूट शेअर केलंय.
शर्वरीच्या नव्या फोटोशूटवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करून भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनय सुंदर.. मग असे फोटो कशासाठी? असे म्हणत काहींनी शर्वरीच्या बोल्ड फोटोंवर नाराजीही व्यक्त केलीय.