शर्वरी जोग ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
छोट्या पडद्यावरील 'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सध्या शर्वरी 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत ईश्वरी हे पात्र साकारते आहे.
आपल्या अभिनयासह निखळ सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी ही नायिका तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने पिस्ता कलरचा वन शोल्डर ड्रेस परिधान करून सुंदर फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक दिसते आहे.
शर्वरीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.