साक्षी गांधी ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अवनी साकारून ती घराघरात पोहोचली.
सध्या साक्षी स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत काम करताना दिसते.
या मालिकेत साक्षी ‘यमुना’ची भूमिका साकारत आहे.
साक्षी सोशल मीडियावर सतत फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतंच तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन फोटोशूट केलं आहे.
'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५' साठी तिने हा लूक केला आहे. साक्षी गांधी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.
तिच्या फोटोंवर एका चाहत्याने 'परमसुंदरी' अशी कमेंट केली आहे.