सखी गोखलेचा ग्लॅमरस अंदाज!




सखी गोखले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 



'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.




या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.



सखी मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची एकुलती एक मुलगी आहे. सध्या रंगभूमीवर तिचं 'वरवरचे वधू वर' हे नाटक जोरदार सुरु आहे. 



सखी गोखले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.



नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे खास लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशूटसाठी तिने डेनिम स्कर्ट परिधान केला आहे.



अभिनेत्री या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. तिचे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Click Here