प्राजक्ताने नुकतंच निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.
या फोटोंमध्ये प्राजक्ताचं सुंदर रुप पाहायला मिळत आहे. केसांत गुलाब माळल्याने तिचं सौंदर्य अधिक खुललं आहे.
चांदीचे दागिने घालून आणि अत्यंत साध्या मेकअपमध्येही प्राजक्ताचा लूक उठून दिसत आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावरुन चाहत्यांना करिअर आणि लाइफमधील अपडेट्स देत असते.