अभिनेत्रीने रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते.
नुकतंच अभिनेत्रीने रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. तिने साडी नेसून Elegant लूक केला आहे.
गळ्यात मोत्याच्या माळा घालत प्राजक्ताने खास फॅशन केली आहे.
प्राजक्ता तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. वेगवेगळे आऊटफिट ती ट्राय करताना दिसते.
प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे.
तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड आहे. तर निर्मिती क्षेत्रातही तिने पाऊल ठेवलं आहे.
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती नेहमीच चाहत्यांना प्रेरित करत असते.