अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
प्राजक्ताला 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका तिने साकारली होती.
या भूमिकेमुळे प्राजक्ताला प्रसिद्धी मिळाली. दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे.
नुकतंच प्राजक्ताने नऊवारी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
फिकट जांभळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ता नटल्याचं दिसत आहे. भरजरी ज्वेलरी घालत तिने सुंदर साज केला आहे.
प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.