ओळखा पाहू, कोण आहे ही?
आजकाल ग्लॅमरच्या जगतात हॉट लूक्स आणि बोल्डनेसच्या बाबतीत मराठी अभिनेत्री मागे नाहीत.
मराठमोळ्या नायिकाही हल्ली बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारे बोल्ड अन् बिनधास्त फोटोशूट करताना दिसतात.
नेहा पेंडसे (Neha Pendse) हिचे नाव मराठी बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्रींच्या यादीत कायमच आघाडीवर असते.
नेहा पेंडसेने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपली वेगळी ओळख निर्माण करून लोकप्रियता मिळवली.
'मे आय कम इन मॅडम?' या हिंदी मालिकेमुळे नेहा घराघरात पोहोचली.
नेहा पेंडसेने आपल्या ताज्या फोटोशूटमधील निवडक फोटोंची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
थायलंडच्या निसर्गरम्य रिसॉर्टवरील स्विमिंग पूलमध्ये नेहा पोहण्याचा आनंद लुटताना दिसतेय.
तसेच आपल्या ग्लॅमरस लूकला बोल्डनेस तडका दिल्याने नेहाच्या नव्या फोटोशूटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.