मराठमोळ्या ग्लॅमरस अभिनेत्रीचा 'कान्स'नंतरही जलवा
मराठीसोबतच हिंदी सिनेइंडस्ट्री गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
नेहा पेंडसे ही कायम आपल्या ग्लॅमरस लूकमुळे आणि विविध विधानांमुळे चर्चेत असते.
मराठीबरोबरच हिंदीतही नेहाने आपल्या बिनधास्त ग्लॅमरस भूमिकांनी ओळख निर्माण केली.
मराठी आणि हिंदी इंडस्ट्री गाजवणारी नेहा यंदा पहिल्यांदाच 'कान्स'च्या रेड कार्पेटवर झळकली.
कान्समध्ये मराठमोळ्या नेहाने रेड कार्पेट गाजवल्यानंतरही तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगलीय.
नव्या फोटोशूटमध्ये ती निसर्गरम्य ठिकाणी 'मी-टाईम' म्हणजे स्वत:साठीचा वेळ घालवताना दिसतेय.
आकाशात सूर्यकिरणे, ड्रेसवर फुलांचे डिझाइन अन् हृदयात शांतता या कॅप्शनसह तिने फोटो पोस्ट केलेत.
नेहा पेंडसेच्या या ग्लॅमरस ताज्या फोटोशूटला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळताना दिसतंय.