मयुरी देशमुख ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुखने अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
दरम्यान, मयुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. या लूकवर मयुरीने सुंदर कानातले घातले आहेत.
शिवाय या फोटोंमध्ये अभिनेत्री हातात गुलाबाचं फुल घेऊन खूप सुंदर अंदाजात दिसून येत आहे.
मयुरी देशमुखच्या या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
तिच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.