शिवाली परबच्या फोटोशूटची चर्चा! 



'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं.

या कार्यक्रमाने शिवालीला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.

कल्याणची चुलबुली म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत येत असते. 

शिवाली इन्स्टाग्रामवर सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

शिवालीने नुकतंच जंगलात खास फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे.

या फोटोशूटसाठी शिवालीने हटके लूक केला आहे. 

"तू ही रे...". असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. शिवालीचं हे सुंदर फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

Click Here