अश्विनीने नुकतंच हिरव्या रंगाच्या साडीतील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अश्विनी कासार ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. अनेक नाटक, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
तिने साडी नेसून पारंपरिक मराठमोळा लूक केला आहे. त्यावर तिने खड्यांची ज्वेलरी घातली आहे.
हातात हिरव्या बांगड्या आणि केसांत गजरा माळल्याने अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
अश्विनीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अश्विनी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.