'पवित्र रिश्ता'च्या सोज्वळ सूनेचा बोल्ड फोटोशूट
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडे ओळखली जाते.
वेगवेगळे टीव्ही शो, विविध चित्रपटांमधून अभिनय करुन तिने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.
आजही अंकिता लोखंडे हे नाव ऐकल्यानंतर पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेचेच नाव चाहत्यांच्या तोंडावर येते.
पवित्र रिश्तामध्ये अंकिताची भूमिका सोज्वळ सुनेची होती. पण सध्या अंकिता हॉट अदांमुळे चर्चेचा विषय ठरतेय.
अंकिता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तसेच तिचा सोशल मीडियावरील बोल्डनेसही चाहत्यांना भावतो.
नुकताच अंकिताने समुद्रकिनारी वाळूत मादक पोजमधील फोटोशूट केला आहे. या फोटोशूटची तरुणाईमध्येही चर्चा आहे.
'आजची रात्र आगीप्रमाणे असलेल्या या 'हॉटनेस'साठी तयार नव्हती', असे कॅप्शनही अंकिताने फोटोशूटला दिले आहे.