अमृता देशमुख ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'फ्रेशर्स', 'मी तुझीच रे', 'तुमचं आमचं सेम असतं' यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली.
याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातही ती झळकली होती.
नुकतंच अभिनेत्री सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
जांभळ्या रंगाचा पैठणी ड्रेस त्यावर मोत्यांच्या दागिन्यांचा साज परिधान करुन तिने शृंगार केला आहे.
अमृता देशमुख या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अभिनेत्रीच्या या खास फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.