ऐश्वर्या नारकर यांनी साऊथ इंडियन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याची आजही चर्चा होताना दिसते.
ऐश्वर्या या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच त्यांनी साऊथ इंडियन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाची साऊथ इंडियन साडी नेसून अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
केसांत गजरा माळत आणि कपाळावर साऊथ सारखा टिळा लावत त्यांनी लूक केला आहे.
ऐश्वर्या यांचे हे फोटो पाहून 'मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...' या गाण्याच्या ओळी आठवतात.
ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या यांचं सौंदर्य आणि सुडौल शरीरयष्टी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
त्यांचा साऊथ इंडियन लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.