मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्याचं फोटोशूट! 

मराठी अभिनेत्याने मुंबईच्या रस्त्यांवर खास फोटोशूट केलं आहे. 

'काही दिया परदेस' या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. 

ऋषी सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. 

नुकतंच ऋषी सक्सेनाने मुंबईच्या रस्त्यांवर फोटोशूट केलं आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ ऋषीने हे फोटोशूट केल्याचं दिसत आहे. 

पांढरा कुर्ता पायजमा घालत त्याने अगदी सिंपल लूक केला आहे. 

फोटोंसाठी त्याने रस्त्यावर पोझ दिल्या आहेत. त्याच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Click Here