प्रियदर्शिनी इंदलकर ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रियदर्शिनी इंदलकर हे नाव घराघरात पोहोचलं.
चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे.
सध्या प्रियदर्शिनी 'गाडी नं. १७६०' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याद्वारे अभिनेत्री तिचे सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करते.
नुकतेच प्रियदर्शिनीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन तिने हटके फोटोशूट केलं आहे.
फोटोंमधील प्रियदर्शिनीचा स्टाईलिस्ट अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.