भारतीय उच्च शिक्षण, नाेकरीसाठी आता जगभरात गेले आहेत. पण, या १० देशांमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय दिसून येते. काेणते आहेत हे १० देश ?
कुवेतलाही स्थायिक हाेण्यासाठी भारतीय पसंती देत आहेत. १० लाख भारतीय कुवेतमध्ये राहात असून ऑइल सेक्टरमध्ये कार्यरत आहेत.
श्रीलंका देशात जवळपास १६ लाख भारतीय राहतात. चहाच्या बागा, टूरिझम आणि आयटी क्षेत्रात इथे भारतीय काम करीत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत आजच्या घडीला १७ लाख भारतीय राहतात. आफ्रिका भागांमध्ये इथेच सर्वाधिक भारतीय असून बिझनेस क्षेत्रात कार्यरत आहेत.
ब्रिटनमध्ये लंडन आणि आसपासच्या परिसरात भारतीय लाेक वास्तव्याला आहेत. १९ लाख भारतीय इथे राहातात.
मान्यमारमध्ये जवळपास २० लाख भारतीय लाेक राहतात. बँक, शासकीय कार्यालये, बिझनेस या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर भारतीय कार्यरत आहेत.
साैदी अरेबियामध्ये तेल क्षेत्रात भारतीय कार्यरत आहेत. तेल क्षेत्राच्या विकासासाठी काम करत आहेत. २५ लाख भारतीय इथे राहतात.
कॅनडामध्ये जवळपास २८ लाख भारतीय राहतात. विविध क्षेत्रात कार्यरत असून अनेकजण उच्च शिक्षणासाठी ही कॅनडाचा पर्याय निवडतात.
मलेशियामध्ये २९ लाख भारतीय राहतात. साऊथ इस्ट कंट्रींमध्ये मलेशियामध्ये सर्वाधिक भारतीय स्थायिक आहेत.
युनायटेड अरब इमिरेट्स यूएईमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. ३६ लाख भारतीय इथे स्थायिक आहेत.
अमेरिका हा असा देश आहे, जिथे भारतानंतर सर्वाधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. जवळपास ५६ लाख भारतीय हे अमेरिकेमध्ये राहातात.