पेग्विंन दगड देऊन करताे प्रपाेज!

प्रपाेज करण्यासाठी अनेकजण हटके स्टाईल वापरून चर्चेत येतात. पण, इथे पेंग्विन मात्र दगड देऊन आयुष्यभराचा साथीदार मिळवताे. 

नर पेंग्विन मादी पेंग्विनला गुळगुळती छान, माेठा दगड देऊन प्रपाेज करताे. दगड देऊन प्रपाेज ऐकायला कसतरी वाटत आहे ना?

पण, पेंग्विन दगड देताे, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, पेंग्विनच्या आयुष्यात दगडांना फार महत्त्वाचे स्थान आहे. 

पेंग्विन राहण्यासाठी जे घरटे बनवताे, ते दगडाचे असते. दगड एकामेकावर रचून ताे आपले घरटे तयार करताे. 

नर पेंग्विन प्रपाेज करण्याआधी अनेक दिवस गुळगुळती दगडाच्या शाेधात असताे. दगड शाेधण्यासाठी ताे खूप परिश्रम घेताे. 

नग पेंग्विनने दिलेला दगड मादी पेंग्विनने स्वीकारला, तर ती त्याला आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देते. 

पेंग्विनसाठी दगड म्हणजे प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता याचे चिन्ह आहे. आयुष्यभरासाठी एकत्र येताना याची ग्वाही दगडाद्वारे दिली जाते. 

पेंग्विन आपल्या पिल्लांसाठी घरटे बांधताना पारखून दगडाची निवड करताे. एकावर एक रचून सुंदर घरटे तयार करताे. 

मादी पेंग्विन माेठा, सुंदर, गुळगुळीत दगड आणणाऱ्या नराला पसंती देते असे दिसून आले आहे.

काही वेळा नर पेंग्विन दुसऱ्यांच्या घरट्यातले दगड चाेरून प्रपाेज करण्यासाठी वापरतात. प्रपाेज करण्यासाठी स्मार्ट वर्क करतात.

Click Here