कडधान्यांना मोड आणण्याच्या सोप्या ट्रिक्स

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, लोह यांचं पुरेपूर प्रमाण असतं. 

हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे अनेकदा कडधान्यांना चांगले मोड येत नाहीत.

मोड आलेले कडधान्य खाण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच, हिवाळ्यात कडधान्यांना मोड आणण्याची ट्रीक पाहुयात.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, लोह यांचं पुरेपूर प्रमाण असतं. त्यामुळे कडधान्य शरीरासाठी कायमच चांगले.

कडधान्यांना मोड आणण्यासाठी ते कायम सुती कापडामध्येच गुंडाळा. यामुळे कडधान्यांना उब मिळते व मोड येण्याची प्रक्रिया सुलभ होते.

भिजलेले कडधान्य उबदार ठिकाणी ठेवा. गॅसजवळ, चुलीजवळ किंवा किचनमधील एखाद्या कोपऱ्यात कडधान्य ठेवावेत.

अनेकजण कडधान्य भिजल्यावर फ्रीजमध्ये ठेवतात. असं करु नका यामुळे चुकूनही कडधान्यांना मोड येणार नाहीत.

कमी पाणी प्यायल्यामुळे उद्भवतात 'या' शारीरिक समस्या

Click Here