मखाणे हे आराेग्यासाठी लाभदायक असतात. मखाणे वेगळ्या पद्धतीने खाल्यास त्याचा आणखीन फायदा तुम्हाला मिळू शकताे.
मखाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, फाॅस्फरस, पाेटॅशियम अशी अनेक पाेषक मूल्य असतात. मखाण्याच्या सेवनाने नक्कीच फायदा हाेताे.
मखाण्यांचा आहारात समावेश केला, तर त्याचे अनेक फायदे आहेत. अनेकदा तुपावर भाजून मखाणे खाले जातात.
मखाण्यांचा रायता करून तुम्ही खाऊ शकता. दह्यात मखाणे घालून खाल्यास शरीराला थंडावा मिळताे. चवही छान लागते.
मखाण्यांच्या रायत्यातून शरीराला व्हिटॅमिन्स आणि प्राेटीन्स मिळतात. जेवणात मखाण्यांचा असा समावेश करा पौष्टिक अन्नही पाेटात जाईल.
मखाणे ब्रेकफास्टसाठीही तुम्ही खाऊ शकता. दुधात भिजवून त्यात सुकामेवा घालून खाल्यास एक हेल्दी ब्रेकफास्ट हाेऊ शकताे.
दुधात नुसते मखाणे भिजवून खायचे नसतील, तर मखाण्यांची खीर करून तुम्ही खाऊ शकता. लहान मुलांसाठी हा पर्याय उत्तम आहे.
तुप, थाेड मीठ, पेरीपेरी मसाला घालून मखाणे भाजल्यास त्याला उत्तम चव येते. वेटलाॅस आणि फिटनेससाठी मखाणे उत्तम पर्याय आहे.