राेजच्या रूटीनसाठी स्वतःला करा माेटिवेट

राेजचं रूटीन फाॅलाे करायला कंटाळा येताे, ऑफिसला जाण्यासाठी स्वतःला माेटिवेट करावे लागते का? तर मग या आयडियाज तुमच्यासाठी...

ब्रेक ताे बनता है. सतत काम केल्यान शारीरिक आणि मानसिक थकवा येताे. कामामध्ये शाॅर्ट ब्रेक घ्या. २ मिनिट एखाद्या ठिकाणी शांत बसा. 

स्वतःला वेळ द्या. नाेकरी करताना फक्त नाेकरी घर इतकंच स्वतःला सिमित ठेवू नका. स्वतःच्या छंदासाठी राेज थाेडा वेळ काढा. 

जवळच्या व्यक्तींशी बाेला. राेजच्या रुटीनचा ताण येत असेल, तर मित्रांशी, कुटुंबातल्या व्यक्तींशी ताण शेअर करा. त्यांचा सल्ला घ्या. मनं थाेडं हलक हाेईल. 

स्वतःवर फाेकस करा. ऑफिसमध्ये अधिक काम असेल, तर दुसऱ्यांची मदत घ्या.  मध्ये थाेडावेळ थांबा दुसर काम करा, यामुळेही तुम्हाला थाेडं फ्रेश वाटेल.

नवीन गाेष्टी शिका. फक्त ऑफिसमध्ये काम करत राहू नका. त्याचबराेबर नवीन भाषा, संगीत, नृत्य शिका. स्वतःला अपडेटेड ठेवा. 

स्वतःचा डेस्क छान सजवा. माेटिवेशन काेट्स डेस्कवर लावा. तुम्हाला कामाची प्रेरणा मिळेल, अशा व्यक्तींचे फाेटाे ठेवा. तुम्हाला आनंद मिळेल. 

ऑफिसमध्ये एक तरी चांगला मित्र शाेधा. मित्र खूप चांगले स्ट्रेस बस्टर असतात. यामुळे तुमचा ताण कमी हाेईल. 

Click Here