व्हिडीओ बनवा, बक्कळ पैसे कमवा

देशाची कंटेंट क्रिएटर अर्थव्यवस्था वाढतेय २२ टक्के दरानं; सध्या देशात ४५ लाख क्रिएटर्स...

देशाची कंटेंट क्रिएटर अर्थव्यवस्था दरवर्षी २२% दरानं वाढत आहे आणि २०२५ च्या पहिल्या सहामाहीत क्रिएटर अर्थव्यवस्था ३५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 

लोक त्यांच्या स्मार्टफोनचा कॅमेरा चालू करतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील, शॉर्ट्स आणि व्हिडीओ अपलोड करतात. अशा लोकांची संख्या सतत वाढत आहे.

इन्फ्लुएन्सर मार्केटिंग रिपोर्ट २०२५ नुसार, देशात सध्या ४० ते ४५ लाख कंटेंट क्रिएटर्स आहेत, परंतु त्यापैकी फक्त ४.५ लाख ते ६ लाख क्रिएटर्सच्या चॅनेल्सला मॉनिटाइझ करण्यात आलेत

इतकेच लोक या प्लॅटफॉर्मवर वेळ घालवून पैसे कमावत आहेत. अहवालानुसार, देशातील १० पैकी ९ क्रिएटर्स उत्पन्नासाठी सोशल मीडियावर पूर्णपणे अवलंबून नाहीत, असं अहवालात म्हटलं आहे.

कंटेंट क्रिएटर कमाईसाठी अनेक पर्याय शोधतात. दरवर्षी कंटेंट क्रिएटरची संख्या वाढत आहे, परंतु त्यांची कमाई वाढत नाही. 

भारतातील कंटेंट क्रिएटरना कंटेंट निर्मितीतून दरमहा ५०,००० रुपये पगार मिळविण्यासाठी ५ ते ७ वर्षे लागतील. त्याचवेळी, दरमहा २ लाख रुपये कमवण्यासाठी, कंटेंटला ५,००,००० व्ह्यूज मिळायला हवेत.

नॅनो श्रेणीतील १० हजारांपर्यंत ऑलोअर्स असलेले इन्स्टावरून ३०० ते ५००० आणि युट्युबवरून १ हजार ते १० हजारांची कमाई करतात. 

१० हजार ते १ लाख, १ लाख ते ५ लाख आणि ५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेले युट्युबवरून अनुक्रमे ४ हजार ते २ लाख, ५० हजार ते ६ लाख आणि २.५० लाखांपेक्षा अधिक महिन्याला कमावतात.

भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?

Click Here