भारतात अनेक वैविध्यपूर्ण गाेष्टी आहेत. जगातील सर्वात माेठे नदीतील बेट हे देखील भारतात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का?
ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेलं माजुली बेट हे जगातील सर्वात माेठं बेट आहे. माजुली बेट रहस्यमय आणि अनोखं आहे.
आसाम राज्यात माजुली बेट आहे. माजुली बेटाचे क्षेत्रफळ ८८० चाैरस किलोमीटर इतके माेठे आहे. जगातील हे सर्वात माेठे बेट आहे.
माजुली बेटावर राहणाऱ्या लाेकांची जीवनशैली ही नदीशी जाेडलेली आहे. वाहतुकीसाठी इथे बाेटींचा वापर केला जाताे.
या बेटावरील लाेकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. या बेटावर शेती देखील केली जाते.
माजुलीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे वैष्णव सत्र हे आहे. इथे पारंपरिक नृत्य, नाटक आणि कीर्तनाचा खजिना आहे.
माजुली बेटावर उदयाला आलेले सत्रिया नृत्य हे भारतातील शास्त्रीय नृत्यांमध्ये गणले जाते.
माजुली बेटांवर स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे येऊन राहतात. पक्षी प्रेमींसाठी माजुली बेट म्हणजे स्वर्गच आहे.
ब्रह्मपुत्रेतील पूर आणि गाळामुळे बेटाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. शेकडो कुटुंबं विस्थापित झाली आहेत.
जगात नदीमध्ये इतके माेठे बेट दुसरीकडे कुठेही नाही. यामुळे युनेस्काेच्या जागतिक वारसा यादीत माजुला बेट समाविष्ट हाेण्यासाठी प्रस्तावित आहे.