काजळ लावूनी आले मी आज...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता अभिनयासोबतच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते. 

प्राजक्ता माळी हा मराठी सिनेसृष्टीतील लाडका चेहरा आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता अभिनयासोबतच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते. 

नुकतंच प्राजक्ताने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीचं सुंदर रुप पाहायला मिळत आहे. 

प्राजक्ताने निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिने खड्यांची ज्वेलरी घातली आहे. 

अगदी साध्या लूकमध्येही प्राजक्ता मोहक दिसत आहे. तिच्या फोटोंनी चाहते भुलले आहेत. 

"कधी नव्हे ते काजळ लावलं म्हणून..." असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिलं आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोसाठी प्राजक्ताने हा खास लूक केला होता. 

Click Here