सगळ्यात जास्त चर्चा रंगली होती ती वनिताने केलेल्या न्यूड फोटोशूटची.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेल्या वनिता खरातचा आज वाढदिवस आहे.
'कबीर सिंग'मधील भूमिकेमुळे वनिता प्रसिद्धीझोतात आली होती.
पण, सगळ्यात जास्त चर्चा रंगली होती ती वनिताने केलेल्या न्यूड फोटोशूटची.
काही वर्षांपूर्वी वनिताने न्यूड फोटोशूट केलं होतं. तिचं हे फोटोशूट प्रचंड व्हायरल झालं होतं.
या फोटोशूटमुळे वनिताला ट्रोलही केलं गेलं होतं. पण, या फोटोशूटमधून तिने संदेश दिला होता.
"वजन जास्त म्हणजे सुंदर नाही" असं म्हणत बॉडीशेमिंग करणाऱ्यांना तिने चपराक दिली होती.
तर लठ्ठपणामुळे न्यूनगंड आलेल्या कित्येकांसाठी वनिताने प्रेरणा म्हणून हे फोटोशूट केलं होतं.