शिवालीच्या सौंदर्यावरुन चाहत्यांची नजर हटतच नाहीये.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धी मिळालेला नवखा चेहरा म्हणजे शिवाली परब.
शिवालीचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकतंच शिवालीने नऊवारी साडीत फोटोशूट केलं आहे.
शिवालीने हिरव्या रंगाचा नऊवारी नेसली आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
दागिन्यांचा साजश्रृंगार करत आणि केसांत गजरा माळत शिवालीने मराठमोळा लूक केला आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव केला आहे.
शिवाली काही सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे.