चेतनाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री चेतना भट 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचली. चेतना विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवते.
चेतनाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
चेतनाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे.
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समुद्राच्या पाण्यात चेतना चिंब भिजल्याचं दिसत आहे.
"Mermaid genes activated" असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो चर्चेत आहेत.
चेतनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.