'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम. या शोने अनेक नवोदितांना संधी दिली.
याच शोमधून अभिनेता प्रथमेश शिवलकर घराघरात पोहोचला. प्रथमेश त्याच्या चाहत्यांना खळखळवून हसवतो.
नुकतंच प्रथमेश खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रथमेशने फोटोशूटसाठी खास लूक केला आहे. डोळ्याला गॉगल लावून त्याने पोझ दिल्या आहेत.
त्याचा डॅशिंग अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.
प्रथमेश सध्या 'थेट तुमच्या घरातून' या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.