महादेवी वनतारामध्ये असं जगतेय? पहा व्हिडीओ

महादेवी हत्तीणीचा दिवस कसा जातो?

कोल्हापूर जिल्ह्यात नांदणी येथे असलेल्या स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य जैन मठात ३३ वर्ष राहिलेली महादेवी हत्तीण आता वनतारामध्ये आहे.

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि महादेवी हत्तिणीला गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आले.

महादेवीला माधुरी नावानेही ओळखले जाते. तिला काही शारीरिक व्याधीही आहेत. पायांमध्ये गँगरीन, सांधेदुखी, वाढलेली नखे याचा तिला त्रास आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महादेवीबद्दल म्हटलं होतं की, 'धार्मिक प्रथा महत्त्वाच्या असल्या तरी प्राण्याच्या सन्मानाचा आणि सुखाचा अधिकार सर्वोच्च आहे.'

सध्या वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रात महादेवी हत्ति‍णींवर उपचार सुरू आहे.

वनतारामध्ये महादेवी नैसर्गिक अधिवासात असून तिथे फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

महादेवी 'वनतारा'मध्ये आल्यानंतर तिला जलचिकित्सा, फिजिओथेरपी, रेडिओलॉजिकल तपासण्या, संतुलित आहार आणि साखळदंडविरहित निवास या साऱ्या सुविधा दिल्या गेल्या आहेत.

इतर हत्तींसोबत मिसळण्याची संधीही दिली जात आहे. या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचे चलनवलन सुधारत आहे.

'हे' लाल कंदमुळ आहे आलियाच्या सौंदऱ्याचं रहस्य

Click Here