जास्त पिकलेली केळी फेकून देताय?  तयार करा हेल्दी हेअर मास्क

केळ्यापासून तयार करण्यात येणारा हेअर मास्क अत्यंत सोपा आहे.

बऱ्याचदा काय होतं घरात केळी आणून ठेवली की ती लगेच पिकतात. मग नाईलाजाने ही जास्त पिकलेली केळी फेकून द्यावी लागतात.

पिकलेली केळी फेकून देण्यापेक्षा त्याच्यापासून एक मस्त हेअर मास्क करता येईल. विशेष म्हणजे हा मास्क कसा करावा हे धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितने सांगितलं आहे.

केळ्यापासून तयार करण्यात येणारा हेअर मास्क अत्यंत सोपा असून त्यासाठी लागणारी साधनसामुग्रीदेखील आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होते.

एका भांड्यात पिकलेली केळी,एक चमचा मध आणि २ चमचे दही मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा.

तयार झालेली पेस्ट केसांना साधारणपणे अर्धा-पाऊण तास तशीच लावून ठेवा.

अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवा. तसंच केस धुतांना सौम्य शाम्पू किंवा शिकेकाईचा वापर करा.

दिवसभरात किती पाणी प्यावं?

Click Here