सतत थकवा जाणवतो? ही आहे धोक्याची घंटा 

शरीरात हिमोग्लोबिनची योग्य पातळी असणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिनची पातळी कमी  होणे आरोग्यास हानिकारक असते. जाणून घ्या उपाय! 

हिमोग्लोबिन शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करत. हे एक प्रकारचे प्रथिने असून लाल रक्तपेशींमध्ये आढळून येते. 

हिमोग्लोबिन फुफ्फुसातील ऑक्सिजन शरीरातील इतर भागात वाहून नेते. शरीरातील कार्बनडाय ऑक्साइड फुफ्फुसाकडे वाहून नेते. 

महिलांसाठी हिमोग्लोबिनची रेंज ही 12 g/dL ते 15  g/dL इतकी आहे. 

पुरुषांसाठी हिमोग्लोबिनची रेंज 15  g/dL ते 18 g/dL इतकी आहे. 

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास अशक्तपणा जाणवतो, थोडं काम केल्यावरही थकवा जाणवू लागतो. 

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, चक्कर येणे असा त्रासही जाणवू लागतो. 

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी पालक, बीट, डाळींब, खजूर, अंजीर या पदार्थांचा समावेश करावा. 

संत्र, लिंबू, आवळा, टोमॅटो या सारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. हिमाेग्लाेबिन वाढीसाठी याचा उपयाेग हाेताे. 

हिमाेग्लाेबिनचे प्रमाण खूपच कमी असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली पाहिजेत. 

Click Here