वजन कमी करणाऱ्यांसाठी आज आपण काही लो कॅलरीज स्नॅक्स कोणते ते पाहुयात.
सध्याच्या काळात अनेक जण फिटनेस फ्रिक झाले असून प्रत्येक जण वेगवेगळे डाएट करण्याच्या मागे आहे.
अनेक जण जीममध्ये घाम गाळतात. तर, काही जण जीमसोबतच त्यांच्या डाएटकडेही जातीने लक्ष देतात.
वजन कमी करणाऱ्यांसाठी आज आपण काही लो कॅलरीज स्नॅक्स कोणते ते पाहुयात.
स्प्राऊट्स अर्थात उकडलेले कडधान्य. मोड आलेले मूग किंवा अन्य कडधान्य घेऊन त्यात टोमॅटो, कांदा, लिंबू, चाट मसाला मिक्स करुन त्याची स्प्राऊट्स भेळ करता येऊ शकते.
मूगडाळ चिला- भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा चिला किंवा घावण हा सुद्धा लो कॅलरीजचा बेस्ट ऑप्शन आहे.
फ्रूट चाट - ज्यांना फळ खायला आवडतात. त्यांच्यासाठी वजन कमी करण्याच्या मार्गातील हा बेस्ट पर्याय आहे.