लोकमान्य टिळकांचे १० प्रसिद्ध अन् प्रेरणादायी विचार

लोकमान्य टिळकांनी अनेक प्रेरणादायी अन् आजच्या काळात देखील लागू होतील असे विचार दिले आहेत. 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही.

जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे; ती फक्त पशुवृत्ती होय.

माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे.

महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात.

कार्यात यश मिळो वा न मिळो, प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये.

जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते, तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते.

एक जुनी म्हण आहे की, जे स्वतःला मदत करतात, त्यांना देव मदत करतो.

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल; गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल?

आपण फक्त कार्य करत रहा, त्याच्या परिणामाकडे लक्ष देऊ नका.

Click Here