ओठांजवळील त्वचा कोरडी पडल्यामुळे त्या ठिकाणी आग होते किंवा ती त्वचा काळवंडते.
हिवाळ्यात कोरड्या हवामानामुळे स्कीन ड्राय होते. ज्यामुळे त्वचेवर भेगा पडायला लागतात. यात खासकरुन चेहऱ्यावर आणि ओठांजवळील भागावर ही समस्या जास्त जाणवते.
अनेकदा ओठांजवळील त्वचा कोरडी पडल्यामुळे त्या ठिकाणी आग होते किंवा ती त्वचा काळवंडते. त्यामुळेच या समस्येवर कोणते उपाय करता येतील ते पाहुयात.
कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे ही समस्या जाणवते. त्यामुळे स्कीन हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे.
चेहरा धुतांना सतत साबणाचा किंवा गरम पाण्याचा वाप करु नका. यामुळे त्वचेवरील तेलाचा थर निघून जातो. ज्यामुळे स्कीन ड्राय होते.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावरही त्याचा परिणाम ओठ आणि त्याच्या आजूबाजूच्या भागावर होतांना दिसतो.
काही वेळा हा त्रास व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्स, लोह किंवा झिंकच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे ओठांजवळ आग होणे, सूज येणे, त्वचा फुटणे आणि काळपटपणा दिसणे या समस्या जाणवतात.
तोंड उघडतानाही आग होण्याचं कारण म्हणजे त्या भागात आलेल्या सूक्ष्म भेगा. त्या भेगांमधून त्वचा ताणली गेल्यावर जळजळ होते. सततची जळजळ आणि कोरडेपणा राहिल्यास त्या भागाची त्वचा जाड आणि काळी पडू लागते.
या त्रासावर उपाय म्हणजे पुरेसे पाणी पिणे, आहारात तूप, तेलकट पण पचायला हलके पदार्थ, दूध, ताक, सूप यांचा समावेश करणे.
ऑफिसमध्ये काम करताना सतत झोप येते? मग हे १० उपाय पाहाच