घरात चप्पल घालून वावरणं मानलं जातं अशुभ? 'ही' आहेत मुख्य कारणं
सध्याच्या मॉर्डन लाइफमध्ये घरात चप्पल घालून वावरणं ही एक स्टाइल झाली आहे.
घरात प्रवेश करतांना चप्पल कायम दाराबाहेर ठेवा असा सल्ला आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती कायमच देत असतात.
सध्याच्या मॉर्डन लाइफमध्ये घरात चप्पल घालून वावरणं ही एक स्टाइल झाली आहे. परंतु, घरात चप्पल घालून फिरण्याचे काही तोटे आहेत ते पाहुयात.
भारतीय संस्कृतीमध्ये घराला मंदिरासमान दर्जा दिला जातो. त्यामुळेच घराचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. बाहेरील चप्पल ज्यावेळी आपण घरात घालून येतो. त्यावेळी बाहेरची निगेटिव्हीसुद्धा घरात येते.
घराबाहेर वापरलेल्या चप्पलेला धूळ,घाण, माती असं बरंच काही चिकटलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळी तिच चप्पल तुम्ही घरात वापरता त्यावेळी बाहेरचे बॅक्टेरिया घरात येतात. परिणामी, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
पायातून चप्पल काढली की बऱ्याचदा रिलॅक्स वाटतं. आणि, जमिनीचा स्पर्श पायाला झाला की मानसिक शांतताही मिळते. परंतु, पुन्हा घरात चप्पल घातल्यामुळे जमिनीशी होणारा थेट संबंध तुटतो आणि अस्वस्थता जाणवते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात चप्पल घालून वावरणं अशुभ मानलं जातं. चप्पलेमुळे घरात निगेटिव्ह एनर्जी येते. तसंच घरात लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात चप्पल घालू नये.
उबदार कपड्यांची पॅकिंग करतांना ही खबरदारी घेतली तर वर्षोनुवर्ष राहतील नवेकोरे