शरीर देतंय तुम्हाला संकेत! 'या' समस्यांमुळे येतो डोळ्यासमोर अंधार

डोळ्यासमोर नेमका अंधार का येतो? त्यामागे काही कारणं आहेत

एखादं काम करत असतांना अचानक डोळ्यासमोर अंधार येतो आणि गरगरल्यासारखं वाटतं. असं अनेकांच्या बाबतीत घडतं.

डोळ्यासमोर नेमका अंधार का येतो? त्यामागे काही कारणं आहेत. ती आज जाणून घेऊयात.

बऱ्याचदा लो ब्लड प्रेशरमुळे असं होऊ शकतं. रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधार येणं अशा समस्या निर्माण होतात.

दीर्घ काळ उपाशी राहिल्यामुळे किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळे सुद्धा डोळ्यासमोर अंधार येतो. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे हा त्रास होतो.

जर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल तरीदेखील चक्कर येऊ शकते.

शरीर कायम हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. बराच काळ पाणी न प्यायल्यामुळे सुद्धा चक्कर येते.

याडं लागलं गं....!

Click Here