बराच काळ हे कपडे कपाटात ठेवल्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारचा वास येऊ लागतो.
हिवाळा संपला की स्वेटर, शाल असे उबदार कपडे पुन्हा कपाटात ठेवले जातात.
बराच काळ हे कपडे कपाटात ठेवल्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारचा वास येऊ लागतो. म्हणून, हे कपडे नवेकोरे ठेवण्यासाठी काही टिप्स पाहुयात.
कपडे बॅगमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना स्वच्छ धुवा. आणि, कडक उन्हात छान वाळवा. त्यानंतर बॅगेत ठेवा.
स्वेटर, जॅकेट किंवा अन्य लोकरीचे कपडे शक्यतो ड्रायक्लीन करा.
जर तुम्ही हे कपडे घरी धुणार असाल तर साबणाऐवजी लिक्विड डिटर्जेंट किंवा शॅम्पूचा वापर करा.
कपड्यांच्या घड्या घालतांना योग्य पद्धतीने घाला. उगाच गुंडाळा करु नका. यामुळे लोकरीवर त्याचा परिणाम होतो.
उबदार कपडे कधीच प्लास्टिकच्या बॅगेत ठेवू नका. त्याऐवजी कॉटन बॅग किंवा सुती कापडामध्ये गुंडाळा.