करून घेऊया पारंपरिक दागिन्यांची ओळख 

आजच्या काळात आर्टिफिशिअल ज्वेलरी सर्रास वापरात असली तरी आपले पारंपरिक दागिने हमखास भाव खाऊन जातात; करून घेऊ त्यांची ओळख!

सरी - दोन तारा मिळून केलेली साखळी म्हणजे सरी. सरी हा दागिना गळ्यालगतच  घालतात.

मोहनमाळ - मुशीत घडवलेल्या मण्यांची माळ म्हणजे मोहन माळ.

पुतळी माळ - गोठलेल्या सोन्याच्या नाण्यांची माळ म्हणजे पुतळी माळ

चंद्रहार : एकात  एक अडकवलेल्या वळ्यांची माळ म्हणजे चंद्रहार.  त्यात एकात एक अडकवलेल्या चपट्या वळ्यांचे अनेक सर असतात.

कोल्हापुरी साज : चंद्र कमळ मासा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्र्याचे  मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात.

बोरमाळ : सोन्याच्या पातळ पत्र्यांचे  मणी  बनवून त्यात लाख भरूनही ती बनवली जाते. त्यामुळे कमी सोन्यातही मजबूत दागिना तयार होतो.

ठुशी : छोट्या मण्यांचा गळ्याबरोबर असलेला दागिना. मण्यांच्या आकारामुळे नाजूक दिसतो, समारंभात लहान मुलींनाही शोभून दिसतो.

तर मग तुमच्याजवळ कोणता आहे आई-आजीकडून वारशाने मिळालेला किंवा तुम्ही खरेदी केलेला पारंपरिक दागिना?

Click Here

Your Page!