लिंबूपाणी प्यायल्याने होतो किडनीवर गंभीर परिणाम?

उपाशीपोटी लिंबूपाणी पिणं योग्य की अयोग्य?

अनेक जण वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यात लिंबाचा रस घालून त्याचं सेवन करतात.

रिकाम्यापोटी लिंबूपाणी प्यायलं तर वजन झटक्यात वजन कमी होतं असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेताच हे लिंबूपाणी पितात.

उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचे जितके फायदे आहेत. तितकेच त्याचे दुष्परिणामदेखील आहेत. 

उपाशीपोटी लिंबूपाणी प्यायल्यामुळे किडनीला नुकसान पोहोचू शकतं. बराच काळापासून जर तुम्ही लिंबू पाण्याचं सेवन करत असाल तर शरीरातील इलेक्ट्रोलाइटमध्ये समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे किडनीचं नुकसान होतं.

शरीरातील अनेक कार्यांमध्ये इलेक्ट्रोलाइटची मदत मिळते. त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोलाइट डिसबॅलेन्स झालं तर किडनी, हृदय, शरीरातील पेशी यांच्यावर त्याचा परिणाम होतो.

इलेक्ट्रोलाइट कमी झाल्यामुळे डोकेदुखी, अनियमित हृदयाचे ठोके, मांसपेशी कमकुवत होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

सनस्क्रीन लावणं का आहे गरजेचं?

Click Here