दोन आठवड्यात मेकओव्हर शक्य !

साखरेचे खाणार त्याला देव देणार....पण काय? तर मधुमेह! म्हणून दोन आठवडे साखर सोडा आणि शरीरात ९ बदल अनुभवा!

साखर नको म्हटल्यावर गूळ खाऊ का? हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण दोन्ही उसापासून बनलेले आहेत, म्हणून दोन्हीचे सेवन अल्प करणे चांगले!

जर तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचा असेल, निदान सुरुवात करायची असेल तर १४ दिवस दिलेला नियम फॉलो करा आणि पुढील ९ फायदे मिळवा!

१४ दिवस साखर सोडल्याने तुमचे पोट आणि चेहरा बारीक होऊ लागेल. 

डोळे, मेंदू, मूत्रपिंड आणि एकूणच शरीराचे कार्य अधिक वेगाने होईल. 

रात्री वारंवार टॉयलेटला किंवा लघवीला जात असाल तर तो त्रासही नियंत्रणात येईल. 

दिवसभर थकवा जाणवत असेल तर साखर सोडल्याने अधिक ऊर्जा जाणवू लागेल. 

सतत गोड खावेसे वाटत असेल तर ती इच्छाही कमी होईल. 

अंगावर सूज असेल, जळजळ होत असेल किंवा अंग आक्रसल्यासारखे झाले असेल तर साखर सोडल्यामुळे त्यातही सुधारणा दिसेल. 

इन्सुलिनच्या पातळीत लक्षणीय बदल आढळून येईल, नैसर्गिक रित्या साखरेची पातळी संतुलित होईल. 

तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा दिसू लागेल, त्वचा स्वच्छ, मुरुमरहित होईल. 

वजन कमी करणाऱ्यांना या गोष्टीचा सर्वात जास्त लाभ होईल. लटकलेले पोट असो वा वाढलेले वजन, नियंत्रणात येण्यास सुरुवात होईल. 

काय मग? आहात का तयार मेकओव्हरसाठी? एकदम साखर सोडणे जमले नाही तर हळू हळू कमी करत शून्यावर येणे शक्य आहे. 

Click Here