जर तुम्हाला चांगला लीडर व्हायचं असेल तर तुमच्यात काही महत्त्वाच्या क्वालिटी असणं गरजेचं आहे.
टीम लीडर होणं ही सोपी गोष्ट आहे. परंतु, मिळालेली पोस्ट टिकवून ठेवणं आणि इतरांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणं हे मात्र चांगलंच कठीण आहे.
जर तुम्हाला चांगला लीडर व्हायचं असेल तर तुमच्यात काही महत्त्वाच्या क्वालिटी असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला उत्तम नेतृत्वाची सुरुवात करायची असेल तर, सहकाऱ्यांच्या कामाची दखल घ्या, त्यांना वेळोवेळी प्रेरणा द्या, मार्गदर्शन करा.
सहकाऱ्यांच्या विकासाला चालना मिळेल अशा संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करुन द्या.
जो लीडर सहकाऱ्याच्या कामाला प्रोत्साहन देतो. त्याचं 50% काम हे त्याचवेळी झालेलं असतं.
सहकाऱ्यांची कामगिरी ही त्याच्या आकडेवारीवरुन नाही तर तुम्ही त्याला ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे किंवा त्याच्या कामाचा पाठपुरावा केला आहे यावर ठरत असते.
सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध जपा. ज्यामुळे सहकारी त्यांच्या अडचणी तुमच्यासोबत बिनधास्तपणे शेअर करु शकतील. यामुळे सहकाऱ्याच्या कामात कशामुळे चूक होतीये हेदेखील तुम्हाला लगेच कळेल.
टीमवर्क मजबूत करायचं असेल तर सहकाऱ्यांसोबत पारदर्शकता ठेवणं, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे.