जीमला जायचा आळस.... वेट लॉससाठी घरीच करा हे ७ व्यायाम
कमी मेहनतीत, सोप्या रीतीने आणि घरच्या घरी वजन कमी करता येतं
कमी मेहनतीत, सोप्या रीतीने आणि घरच्या घरी व्यायाम करता येतात. हे व्यायाम चरबी कमी करून वजन घटवण्यासाठी प्रभावी ठरतात.
पहिला व्यायाम म्हणजे घरात किंवा परिसरात चालणे. चालताना काही वेळ जलद गतीने चालल्यामुळे अधिक कॅलरी बर्न होतात.
दुसरा व्यायाम म्हणजे मिनी-ट्रॅम्पोलिनवर किंवा ‘रिबाऊंडर’वर हलक्या उड्या मारणे. NASA च्या मते, फक्त १० मिनिटे रिबाऊंडिंग करणे हे ३० मिनिटांच्या धावण्यापेक्षा जास्त परिणामकारक आहे.
तिसरा व्यायाम म्हणजे खुर्चीच्या आधाराने स्क्वॅट्स करणे. यात तुम्ही खुर्चीसमोर उभे राहून बसल्यासारखे हळूहळू खाली वाकायचे, खुर्चीला फक्त हलके स्पर्श करायचे आणि पुन्हा उभे व्हायचे.
चौथा व्यायाम म्हणजे उभे राहून क्रंचेस. यात हात डोक्याच्या मागे ठेवून सरळ उभे राहायचे, उजवे गुडघे डाव्या कोपराकडे उचलणे असं दोन्ही बाजूंनी आलटून पालटून करायचे.
पाचवा व्यायाम म्हणजे खुर्चीच्या आधाराने ‘स्टेप-बॅक’ आणि ‘लंजेस’ करणे. यात खुर्चीचा पाठीचा भाग पकडून संतुलन ठेवायचे आणि एक पाऊल मागे टाकायचे किंवा लंज करायचे.
स्क्वॅट करताना हलक्या डंबेल्स किंवा घरातील वस्तू हातात घेऊन डोक्यावर उचलायच्या. या प्रकारे एकावेळी अनेक स्नायू कार्यरत होतात आणि शरीराचा चयापचय वेग वाढतो.
सातवा व्यायाम म्हणजे ‘लेझी जंपिंग जॅक्स’. यात पूर्ण उड्या न मारता फक्त बाजूला पावले टाकायची. हा कमी इम्पॅक्ट व्यायाम असून रक्ताभिसरण सुधारतो आणि शरीराला ऊर्जावान ठेवतो.