दुधी भोपळा ही एक पौष्टिक भाजी आहे. यात ९२% पाणी असते जे हायड्रेशन राखते आणि यात कॅलरीज देखील कमी असतात.
दुभी भोपळ्यात व्हिटॅमीन सी, के आणि कॅल्शियम असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच वजन कमी करण्यासही प्रभावी आहे.
दुधी भोपळ्यात फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचन सुधारते आणि भूकही कमी करते.
रोज भोपळा खाल्ल्याने चयापचय वाढतो, यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात.
भोपळ्याचे ज्यूस प्याल्याने शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात, यामुळे वजन नियंत्रणात राहते.
रोज भोपळ्याची भाजी खाल्ल्याने शरिरातील उर्जा वाढते आणि थकवाही कमी होतो.
भोपळा हा थंड प्रकृतीचा आहे. यामुळे शरीर शांत राहते आणि ताण कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी, आपण आपल्या आहारात दुधी भोपळ्याचे सॅलड, भाजी अथवा ज्यूसचा समावेश करू शकतो. (टीप - आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!)
ड्रॅगन फ्रूट खाण्याचे तोटेही आहेत बरं का...! जाणून थक्क व्हाल...!