Laughter Therapy ही जगभर प्रसिद्ध आहे. शरीर आणि मनं दाेन्ही तंदुरूस्त ठेवण्यासाठी ही माेफत थेरपी आहे.
हसल्यावर डाेपामिन आणि सेराेटाेनिन हे हार्माेन्स निर्माण हाेतात. यामुळे नैराश्य, चिंता कमी हाेऊन माेठा फरक पडताे.
हसणं ही नैसर्गिक कार्डिओ थेरपी आहे. कारण, हसल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहताे, हृदय मजबूत हाेते.
राेज १० ते १५ मिनिटं मनापासून हसल्यास ५० पेक्षा जास्त कॅलरीज बर्न हाेतात. व्यायामाला हा पर्याय नक्कीच नाही. पण, मनासाठी उपयुक्त आहे.
दरराेज थाेडं - थाेडं मनापासून हसायला शिका. तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. हसण्याच्या औषधाचे काेणतेच साइड इफेक्ट्स नाहीत.
डिप्रेशन, बीपी, मधुमेह किंवा काही दुर्धर आजारांसाठी डाॅक्टरही लाफिंग थेरपीचा पर्याय सुचवतात.
भारत, अमेरिका, जपानमध्ये लाफ्टर ग्रुप्स आहेत. हे ग्रुप्स राेज भेटून एकत्र विविध पद्धतीने हसतात. मानसिक आराेग्यासाठी लाभदायक आहे.
हसणं म्हणजे मेडिटेशन आहे. शारीरिर आणि मानसिक तणाव कमी करण्याचे काम हसणं करत. तुमचा मूड लाईट ठेवताे.