मुलींच्या फॅशनविषयी सगळेच बोलतात. आज आपण मुलांना ट्राय करता येईल अशा काही फॅशन टिप्स पाहुयात.
फॅशन म्हटलं की सहाजिकचं मुलींसाठी उपलब्ध असलेले अनेक पर्याय समोर येतात.
कॉटन लिनन शर्ट- कोणत्याही ऋतूमध्ये सहज घालता येण्यासारखा हा शर्ट आहे. खासकरुन उन्हाळ्यात या शर्टला पसंती देण्यात येतं.
कॉटन आणि लिननपासून तयार झालेला हा शर्ट कूल लूक देतोच सोबतच वापरायलाही आरामदायी आहे.
प्रिंटेड कॅज्युअल शर्ट- सध्या या शर्टच्या प्रकाराला तरुणांकडून विशेष पसंती दिली जात आहे.
फ्लोरल,ज्योमेट्रिक आणि ट्रॉपिकल प्रिंट शर्ट खासकरुन ट्रेंडी दिसतात.
जर तुम्ही हा शर्ट उन्हाळ्यात ट्राय करणार असला तर त्यात कॉटन किंवा रेयॉन फॅब्रिकमध्ये प्रिंट असलेला शर्ट वापरु शकता.