दररोज वापरता येतील आणि ट्रेंडी असलेल्या नोजपीन कोणत्या ते पाहुयात.
अनेक स्त्रियांना नोजपीन वापरणं विशेष आवडतं. त्यामुळे बाजारातही नोजपीनच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळतात.
दररोज वापरता येतील आणि ट्रेंडी असलेल्या नोजपीन कोणत्या ते पाहुयात. या नोजपीन तुम्ही दररोजच्या वापरासाठी सहज वापरु शकता.
खासकरुन कॉलेजला जाणाऱ्या मुली ट्राय करु शकतात अशी ट्रेंडी नोजपीन म्हणजे झिकझॅक स्टाइल नोजपीन. ही नोजपीन स्टायलिश असून तितकीच क्लासीही वाटते.
फॅन्सी गोल्ड नोजपीनदेखील सध्या महिलावर्गात लोकप्रिय होत आहे. या नोजपीनसोबत तुम्ही मिडल नोजरिंगदेखील घालू शकता. ही नोजपीन घातल्यामुळे इंडो-वेस्टर्न लूक तुम्हाला मिळू शकतो.
सध्या बाजारात कमळाच्या फुलाची नोजपीन सुद्धा लोकप्रिय होत आहे. ट्रेडिशनल लूकसोबत ही नोजपीन विशेष खुलून दिसते. तसंच ट्रेडिशनल लूकसोबत वेस्टर्न लूकसोबतही ती मॅच करता येते.
महिला वर्गात ऑल टाइम फेव्हरेट असलेली नोजपीन म्हणजे अमेरिकन डायमंड असलेली नोजपीन. एकदम सिंपल पण तितकीच क्लासी वाटणारी ही नोजपीन तुम्ही कोणत्याही आऊटफिटसोबत सहज मॅच करु शकता.
सिंपल स्टोन असलेली नोजपीन ही मुळात फार जुन्या स्टाइलची आहे. परंतु, आजही ती महिलावर्गात लोकप्रिय आहे.